Saturday, June 19, 2010

पुणे

पुणे... खरं तर ह्या विषयावर खूप काही लिहिलं गेलं आहे पण तरीही मी माझा वेळ ह्या विषयावर आज वाया घालवावा म्हणतो... पुण्यावर लिहायचं म्हणजे मराठीतूनच लिहावं लागणार म्हणून आज खास सवड काढूनच लियहायला बसलो आहे आणि जर तुम्हाला काही पुलंशी साम्य आढळलं तर माफ करा कारण पुण्याविषयी कितीही लिहिला तरी पाया पुलंचाच राहणार.

तर तब्बल ३ वर्षांपूर्वी इथे यायचा नक्की झालं.. तरी आमची फॅमिली पक्की मुंबईकर आणि त्यात वर मालवणी असल्याने अगदीच पुण्याच्या विरोधात... "काय करायचे आहे पुण्याला जाऊन, मुंबईत नोकर्‍या काय संपल्या काय रे" पासून "घरच्यांचं ऐकेलं तर तो सिद्धेश कसला?? " पर्यंत ऐकूनच मे पुण्याला निघालो.... पुण्यात जायचं असल्याने मराठीचा व्यासंग वाढावा म्हणून पूल आणि चिवीं सारख्यांची अनुभवाची शिदोरी घरी आणली... आणि थियरीचा अभ्यास पूर्ण झालयावर आम्ही प्रॅक्टिकल कराव म्हणून पुण्याला निघालो....

तसं पाहायला गेलं तर माझ्यासारखीच इतरांनीही मराठीची तयारी केली होती.... पाटेसारख्यांचा सहवास लाभल्याने गुडा तर आधीपासूनच तयार होता... पण कधी कधी ध चा मा जरी करता आला नाही तरी ध चा द पासून ढ पर्यंत कुठेही पोचल्याने पुण्यात त्याचा निभाव तसा अशक्यच होता... छेडाला मराठी जरी समजत असली तरी त्याच्या बाइकप्रमाणे मराठीही त्याला कधीच बोलायला जमणार नाही बहुतेक... एकच सर्वांना पुरून उरु शकणारा होता तो रीदवान होता... मराठीतून प्रश्नावर तितक्याच खुबीने कोकनीतून उत्तर दिल्यावर समोरचा स्वतःच हिंदीतून बोलायला सुरूवात करत...

पुण्यात पोचाल्यावर आमची पहिली गाठ पडली ती रिक्षावाल्याशी... तसा आम्ही पोचल्यावर गुडा पुर्णं तयारीताच होता पण आम्ही मराठीत बोलायला सुरूवात केल्यावर रिक्षावाल्याने ईंग्लिशमध्ये बोलून एकाच बॉलवर आमच्या दोघांची विकेट घेतली.... आता बॉलच्या एवजी जर उद्या कोणी हातबॉम्ब टाकला तर पुर्णं टीम गारद झळ्यास नवल ते काय.... आणि पुण्याच्या रिक्षावाल्यांबद्दल पुलंनिही काही न लिहील्याने आमची थियरीही फेलच गेली...त्यामुळे पुढे ह्या सब्जेक्टमधे आम्हाला आमच्या निरीक्षणांवरच अवलंबुन रहाव लागलं... बहुधा सर्व रिक्षांचे मीटर एकाच वेळी कसे काय बंद पडतात हे प्रत्यक्ष ब्रम्हदेवालाही एक कोडच असावं..... हा पुणेरी एकदा रात्री एकटा घरी जाईल पण ५ रुपये कमी करणार नाही.... कधी कधी नको त्या विषयांवर खूप वेळ हा बोलू शकतो आणि वर त्या वायफळ उपदेशाचे पैसे जोडायला मात्र तो विसरत नाही..... आणि हो मुंबईकरांचा भाड्याविषयीचा आचरटपणा त्याला बिलकुल चालत नाही.... पाऊस पडल्यावर तर तो मुंबईकरांना (मीटर बंदच ठेऊन) सांगायला विसरत नाही ही असा पाऊस मुंबईत तरी पडतो काय... अरे मुंबईसारखा पाऊस जर इथे पडला तर तुला बहुतेक बोटच चालवावी लागेल .... हे आपलं आम्ही मनातच म्हणतो कारण भर पावसात रिक्षावाल्याशी पंगा कोण घेईल...

तशी पुण्याला ऐतिहासिकतेची काहीच कमी नाही पण तीच ऐतिहासिकता लोक जेव्हा लोक विसरत नाहीत तेंव्हा सर्वात जास्त प्रॉब्लेम ट्रॅफिक मधे होतो... पुलंच्या पुण्यात लोक साइकल तलवारीसारखी चालवत होता तर तेच लोक आता बाजीप्रभूच्या आवेषात बाइक चालवताना दिसतात... आणि नखशिखांत झाकलेल्या राणी लक्ष्मीबाई तर रोज दर्शन देतच असतात.... आणि ह्या सर्वा गोंधळात रिक्षावाले घोडदळाच्या जोशात जेंव्हा गाडी हाकतात तेव्हा एरवी मुंबईत शनिसारखा वाटणारा ट्रॅफिक पोलीस इथे देवसारखा भासु लागतो... पण शीटीसारखा निश्प्रभ अस्त्रं हाती लागल्याने हताशपणे बघण्याशिवाय तोही बिचारा काहीच करू शकत नाही....

ह्यात सर्वात स्वतंत्र अस्तीव कोणाचे असेल तर ते पुण्याच्या दुकानदाराचे... पुण्याच्या दुकानदारांबद्दल आजपर्यंत बरेच नाही लिहिलं गेलं आहे तरीही अजुन खूप काही गोष्टी कवर करायच्या राहून गेल्या आहेत... जसे की पुणेरी पाट्या... पुण्याच्या दुकानदारांचा मराठी भाषेचा अभ्यास तर आपल्या परिचयाचा आहेच पण तरीही तोंडावर अपमान करण्यासाठी हजरजबाबीपणा असावा लातो आणि ह्यावर तोड म्हणून पुण्याच्या लोकांनी दुकानासमोर खास लोकांच्या अपमानाच्या पाट्या लावायला सुरू केल्या... बहुतेक त्या न लावल्यास तो फाउल पकडला जात असावा... कारण अगदीच काही नाही तर लोकांनी "आमची कोठेही शाखा नाही" अशा पाट्या लावायला सुरूवात केली... एका ठिकाणी तर त्या मजकुराच्या पुढे कॉपीराइटचे सिंबलही लावलेले मे बघितले आहे... आणि ह्यामुळेच पुण्याला World's funniest city म्हणत असावेत ... funniest च माहीत नाही पण पुणे weirdest तर नक्कीच होऊ शकते....

माझ्यासारख्या मालवणी माणसाचे माश्यांचे दुःख पुण्यातल्या लोकांना काय समजणार... जिथे आमच्यासाठी एक पूर्ण आहारशास्त्र तयार होतं तिथे पुण्यात फिश् ह्या एका शब्दात त्याची अवहेलना होते... एक तर इथे ताजा मासा हा २-३ दिवसांपूर्वीचा असतो... दुसरं फिश् तंदूर मधे टाकायची ह्यांची सवय कधीच जात नाही... आणि एवढं केल्यावर बोनलेस म्हणून माश्याचे काटे काढायची पद्धत तर मालवणी माणसाच्या गळी कधीच उतरत नाही... किंबहुना २-३ काटे गळ्यात अडकल्याशिवाय तृप्ततेचा ढेकर आमच्या नशिबी नाही हे पुणेरी लोकांना पचतच नाही... एवढा असूनही मी पुण्यात मासे खायचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी एकदा ताज्या माशांच्या नावाखाली सुकट खाऊन मला हा नाद शेवटी सोडावाच लागला...

पुण्याच्या विक्षिप्तपणाबद्दल जेंव्हा मी पुणेकरांशी बोलायचा प्रयत्न केला तेंव्हा "काय राव, फक्त जुने लोकच विक्षिप्त आहेत" आणि जुन्या जाणत्यांच्या मते "नमुने फक्त सदाशीवपेठेतच आढळतात" अजुन मला सदाशिवपेठेतला जाणता माणूस भेटायाचा आहे... त्याच्या मते बहुतेक मी मुंबईकरच विक्षिप्त असावा...

आजकाल मात्र मला वाटतं पुण्याबाहेरच्या लोकांनी ह्या पुणेरीपणाविरोधात कारस्थान रचलं असावं... ह्यामुळे एकंदरीत पुण्याची संस्कृतीच धोक्यात आली आहे.... आजकाल टूरिस्ट वॅनच्या धाकाने रिक्षावले चक्क मीटरवर यायला तयार होतात तर तिथे ट्रॅफिक पोलिसांनी पण नवीन आलेल्या कार जमतीला जरा धाकात घ्यायला सुरूवात केली आहे.. तर कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या मॉल्समुळे पाटी संस्कृती धोक्यात आली आहे... हे असच जर चालू राहिला तर ही पुणेरी संस्कृती टिकणार तरी कशी... तेंव्हा पुलंच पुणे जर टिकवायचं असेल तर पुणेकरला नक्कीच कंबर कसावी लागणार आहे.....

No comments: